Thursday, November 27, 2008

जरा याद करो कुर्बानी.........


वाहिन्यान्साठी आचारसंहिता लावण्याची वेळ आली आहे का ?

हेमंत करकरेंचा मृत्यू न्यूज चॅनल्समुळे?
दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख, हेमंत करकरे यांचा मृत्यू काही अतिउत्साही न्यूज चॅनल्समुळे झाला की काय अशी शंका, त्यांचे पोलिस दलातील सहकारी आणि निकटवर्तीय व्यक्त करीत आहेत. दक्षिण मुंबईत अतिरेक्यांनी या नागरी युद्धाला प्रारंभ केला. ही बातमी कळताच करकरे हे तातडीने निघाले. गेटवे ऑफ इंडियासमोरील ताजमहाल हॉटेलमध्ये अतिरेक्यांनी काही लोकांना ओलिस ठेवले आहे आणि तेथे अतिरेकी अनेकांना मारण्याच्या बेतात आहेत हे कळताच करकरे तेथे रवाना झाले. ते सीएसटी स्टेशनसमोर दाखल झाल्यापासून चॅनल्सवर त्यांचे दर्शन होत होते. त्यांनी अतिरेक्यांच्या गोळीबारापासून बचाव करण्यासाठी हेल्मेट आणि शिरस्त्राण घातल्याचेही चॅनल्सवर दाखवले जात होते. त्यानंतर ताज महाल हॉटेलजवळ ते पोहोचल्यावरही त्यांना चॅनल्सवर दाखवले जात होते. ते ताजमहालमध्ये शिरल्यावर, अतिरेक्यांनी त्यांनी हेल्मेट आणि चिलखत घातल्याचे दिसल्यावर अतिरेक्यांनी, नेम धरून त्यांच्या मानेत गोळया घातल्या. त्यामुळे त्यांना वाचवणे डॉक्टरांना कठीण गेले. आणि महाराष्ट्र एका तडफदार पोलिस अधिका-याला मुकला. त्यांच्या या निधनामुळे पोलिस दलालाही धक्का बसला आहे. त्यातील त्यांच्या काही निकटवर्तीयांनी सांगितले, की गेले काही दिवस करकरे मालेगाव प्रकरणामुळे चर्चेत होते. त्यामुळे टीव्ही चॅनलनी त्यांनी हेल्मेट आणि चिलखत घातल्यासारख्या लहानलहान गोष्टी दाखवल्या. यामुळे सावध होऊन अतिरेक्यांनी नेमक्या त्यांनाच लक्ष करून, त्यांच्या मानेच्या बाजूला अचूक नेम साधाला, असे सांगितले जाते.















Wednesday, November 26, 2008

हेमंत करकरे, विजय साळसकर व अशोक कामटे याना भावपूर्ण श्रधांजलि







हेमंत करकरे, साळसकर, कामटे यांना वीरमरण

जब घायल हुआ हिमालय
खतरे मैं पड़ी आजादी
जब तक थी सांस लढे वो
फिर अपनी लाश बिछा दी
संगीन पर धर कर माथा
सो गए अमर बलिदानी
दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री मुंबईवर भयंकर हल्ला चढवला. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात 100 जण ठार झाले असून, २५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अतिरेक्यांशी मुकाबला करताना एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख विजय साळसकर आणि एसीपी अशोक कामठे यांच्यासह ७ पोलिस शहीद झाले आहेत. दक्षिण मुंबईतील सातठिकाणी बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास दहशतवाद्यांनी रक्तरंजित हल्ला चढविला. आपल्याकडील एके ४७ रायफलीमधून अंदाधुंद गोळीबार करीत, त्यांनी ग्रेनेडही फेकले. दरम्यान, पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत चार दहशतवाद्यांना गिरगाव चौपाटीजवळ चकमकीत ठार केले. तर दोन दहशतवाद्यांना ताडदेव येथे अटक करण्यात आली. सुमारे २० अतिरेक्यांनी पूर्वनियोजित कट आखून मुंबईवर हा हल्ला केला. अतिरेक्यांशी मुकाबला करताना तिघा ज्येष्ठ पोलिस अधिका-यांनी वीरमरण आल्याचे वृत्त आहे. एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख विजय साळसकर व एसीपी अशोक कामटे चकमकीत शहीद झाले. त्याशिवाय आणखी सात पोलिसांनाही वीरगती प्राप्त झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लष्कराला पाचारण केले आहे. दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी लष्कराचे जवान लवकरच दाखल होणार आहेत. त्याशिवाय २०० कमांडोचेही या ऑपरेशनमध्ये मदत घेतली जात आहे

Monday, November 24, 2008

'..तयार झालो!' एका अनामिक कवीची गझल.

"....तयार झालो"

जसा जसा मी जगावयाला तयार झालो,
तसा तसा मी लढावयाला तयार झालो..

सडा असा शिंपलास तू अंगणात माझ्या,
पसा पसा मी भरावयाला तयार झालो..

बघून मागे कशीबशी हासलीस जेव्हा,
कसाबसा मी हसावयाला तयार झालो..

न खंत आभाळ फाटण्याची मला तशी पण,
ससा कसा मी बनावयाला तयार झालो?

विषा, तुला ओळखून होतो तरी कसा रे,
नसा नसा मी भरावयाला तयार झालो?

अखेर तू ही मनातले बोललीस जेव्हा,
ढसा ढसा मी रडावयाला तयार झालो !

तुझी न ही पायधूळ जेव्हा मला कळाले,
ठसा ठसा मी पुसावयाला तयार झालो..

तिने नव्याने दिला जरी तो जुना बहाणा,
असा कसा मी फसावयाला तयार झालो?


-प्रवासी......(एक अनामिक कवी.)