Thursday, November 27, 2008

वाहिन्यान्साठी आचारसंहिता लावण्याची वेळ आली आहे का ?

हेमंत करकरेंचा मृत्यू न्यूज चॅनल्समुळे?
दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख, हेमंत करकरे यांचा मृत्यू काही अतिउत्साही न्यूज चॅनल्समुळे झाला की काय अशी शंका, त्यांचे पोलिस दलातील सहकारी आणि निकटवर्तीय व्यक्त करीत आहेत. दक्षिण मुंबईत अतिरेक्यांनी या नागरी युद्धाला प्रारंभ केला. ही बातमी कळताच करकरे हे तातडीने निघाले. गेटवे ऑफ इंडियासमोरील ताजमहाल हॉटेलमध्ये अतिरेक्यांनी काही लोकांना ओलिस ठेवले आहे आणि तेथे अतिरेकी अनेकांना मारण्याच्या बेतात आहेत हे कळताच करकरे तेथे रवाना झाले. ते सीएसटी स्टेशनसमोर दाखल झाल्यापासून चॅनल्सवर त्यांचे दर्शन होत होते. त्यांनी अतिरेक्यांच्या गोळीबारापासून बचाव करण्यासाठी हेल्मेट आणि शिरस्त्राण घातल्याचेही चॅनल्सवर दाखवले जात होते. त्यानंतर ताज महाल हॉटेलजवळ ते पोहोचल्यावरही त्यांना चॅनल्सवर दाखवले जात होते. ते ताजमहालमध्ये शिरल्यावर, अतिरेक्यांनी त्यांनी हेल्मेट आणि चिलखत घातल्याचे दिसल्यावर अतिरेक्यांनी, नेम धरून त्यांच्या मानेत गोळया घातल्या. त्यामुळे त्यांना वाचवणे डॉक्टरांना कठीण गेले. आणि महाराष्ट्र एका तडफदार पोलिस अधिका-याला मुकला. त्यांच्या या निधनामुळे पोलिस दलालाही धक्का बसला आहे. त्यातील त्यांच्या काही निकटवर्तीयांनी सांगितले, की गेले काही दिवस करकरे मालेगाव प्रकरणामुळे चर्चेत होते. त्यामुळे टीव्ही चॅनलनी त्यांनी हेल्मेट आणि चिलखत घातल्यासारख्या लहानलहान गोष्टी दाखवल्या. यामुळे सावध होऊन अतिरेक्यांनी नेमक्या त्यांनाच लक्ष करून, त्यांच्या मानेच्या बाजूला अचूक नेम साधाला, असे सांगितले जाते.















1 comment:

infinite said...

Ho Pravin, You are 100% true... These news channels are bluddy fucker.. Due to this kind reporting we missed valuable person of the country